पाचगणीच्या टेबललॅंडला हिरवा गालिचा अन्‌ फुलांचा साज!

Satara
Satara
Updated on

पाचगणी (जि. सातारा) : कोरोनाने मनुष्याला घरात जखडून ठेवले... शाळा बंद पडल्या. मात्र, शिक्षण काही थांबले नाही. त्याप्रमाणेच रोगाचा प्रादुर्भाव वाढला अन्‌ पर्यटकांची पावले जरी स्थब्ध झाली असली तरी निसर्ग बहरण्याचा काही राहिला नाही... येथील टेबललॅंडचे विस्तीर्ण पठार हिरवळीचा गालिचा अन्‌ त्यावर नक्षीदार फुलांनी बहरून गेला असून, पर्यटकांच्या स्वागताकरिता सतर्क झाला आहे... प्रतीक्षा आहे ती कोरोनाचे ढग बाजूला कधी सरणार याची. 

पाचगणी व परिसरात काही महिन्यांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगररांगांनी हिरवळीचा शृंगार परिधान केला असताना आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार म्हणून जगाच्या नकाशावर विराजमान झालेल्या व सिनेव्यवसायिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या टेबललॅंडचे सतत पडणाऱ्या पावसामुळे रुपडे बदलले आहे. जोरकस पडणाऱ्या पावसामुळे पाण्यासाठी एरवी आसुसलेली जमीन आता पाणी पिऊन तृप्त झाली आहे.

टेबललॅंड येथील तिन्ही तळी आता पाण्याने तुडुंब भरली आहेत. उन्हाळी हंगामात खडकाळ तर काही ठिकाणी दिसणाऱ्या ओसाड परिसरात आता हिरवळीचा गालिचा व त्यावर नक्षीदार फुले जणू पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचा भास होतो. कधी ऊन तर कधी पाऊस, कधी धुक्‍याचे साम्राज्य, सायंकाळी तळ्यातील मासे पकडताना हौशी तरुण दृष्टीस पडतात.

जोरकस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ढगांचे लोट पुढे सरकताना एक न्यारेच दृश्‍य पाहावयास मिळते. पक्ष्यांची किलबिल तर कधी बेडकांच्या डरकाळी कानी पडत असल्या तरी कोरोनामुळे शासनाने येथील विविध प्रेक्षणिय स्थळांवर पर्यटकांवर बंदीचे नियम लादण्याने पर्यटकांची पावले स्तब्ध झाली आहेत. परिणामी तेथील व्यावसायिक, स्थानिकांचे जनजीवन विस्कळित झाले असून, उपासमारीची वेळ आली आहे. 

व्यावसायिकांना रोजगाराची आशा 

पर्यटनावर अवलंबून असणारी कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. आपल्या बदललेल्या रूपाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या वाटा कधी खुलतील, याकडे निसर्गाचे लक्ष लागले असले तरी रोजगाराची संधी कधी मिळणार, याकडे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांच्या 
नजरा लागल्या आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahimangad Fort on the Path to Preservation; State-Protected Status Likely Soon
Karad Airport Modernization Faces Delays; Safety and Development Issues Under Scrutiny
Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes
Koyna Dam Water Levels Reach Critical Stage, Irrigation Withdrawals Stopped
Marathi News Esakal
www.esakal.com