ब्युटीपार्लर व्यावसायिकांना हवी 15 हजार भरपाई, प्रांतांकडे साकडे

Satara
Satara
Updated on

कोरेगाव (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे ब्युटिशियन व्यावसायिकांचे भरून न येणारे नुकसान झाल्यामुळे शासनाने सर्वसाधारण व्यवसायांसाठी दिलेल्या सहायक अनुदानाप्रमाणे ब्युटीपार्लर व्यवसायांना शहरी भागासाठी 15 हजार व ग्रामीण भागासाठी दहा हजारांची भरपाईची मदत द्यावी, या व अन्य मागण्यांचे निवेदन कोरेगाव शहरातील ब्युटिशियन संघटनेने प्रांताधिकारी कार्यालयास दिले आहे. 

ब्युटिशियन संघटनेतर्फे अंजली वीरकर, संजीवनी मोरे, अर्चना बर्गे, सुरेखा सकुंडे, सुरेखा गोरे, अपर्णा चिनके, सज्जना दुटाळ, लतिका निकम यांनी यासंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल काळे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून, कोरेगाव तालुक्‍यातील ब्युटीपार्लर व तत्सम सर्व व्यवसायांना सर्वात मोठा फटका बसला आहे. ब्युटीपार्लर व्यावसायिकांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. कर्जाचे हप्ते, व्यापारी देणी, दुकान भाडे, वीजबिल, स्थानिक करासह विविध प्रकारचे कर या बाबी न चुकणाऱ्या आहेत. बॅंकांची कर्जे काढून उभ्या केलेल्या पार्लर व्यवसायावर आमचे कुटुंब, कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे.

सातत्याने होत असलेल्या लॉकडाउनमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर ब्युटिशियन व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने सानुग्रह अनुदानासारखी मदत देऊन दीर्घ मुदतीचे विनाव्याज कर्ज उपलब्ध करून द्यावे. लॉकडाउन काळातील पार्लर व्यावसायिकांची वीजबिले माफ करावीत. ब्युटिशियन संघटनेने कोरोना सुरक्षिततेसाठी आवश्‍यक ते आरोग्य प्रशिक्षण घेतल्याने पार्लरमधून कोरोनाचा प्रसार होत नाही, असा प्रचार शासनाच्या माध्यमातून व्हावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com