
सातारा : येथील रा. ना. गोडबोले (सार्वजनिक) ट्रस्ट व जिल्ह्यातील नागरिकांतर्फे दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार २०२४ चा ३४ वा पुरस्कार कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले यांना जाहीर झाला आहे. कला, क्रीडा, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या व आपल्या उत्तुंग यशाने साताऱ्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना १९९१ पासून हा पुरस्कार दिला जातो. डॉ. भोसले यांना लवकरच एका कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करणार असल्याची माहिती ट्रस्टी अशोक गोडबोले, उदयन गोडबोले व डॉ. अच्युत गोडबोले यांनी दिली.