अजित पवार, राजेश टाेपे येण्यापुर्वी 2 लॅबला टाळे; 3 ला नाेटीस

तरीही काहींनी चालढकल केली. त्यामुळे गंभीर त्रुटी असणाऱ्या लॅब्सवर कडक कारवाईचा इशारा दिला गेला.
sealed
sealede-sakal

सातारा : कोविड-19 आजाराच्या दुसऱ्या लाटेमध्ये (covid19 second wave) बहुतांश खाजगी व शासकीय आरोग्य संस्थेतील कर्मचारी पॉझिटिव्ह (corona positive report) आल्याने रॅट चाचणी (rat test) डाटा वेळेत भरण्यात आलेला नाही. त्यामुळे 24 आणि 25 मे 2021 या दाेन दिवसांत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या विशेष निवड समितीने जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय रॅट चाचणी केंद्रास भेट दिली असता रॅट चाचणी केंद्रात काही त्रुटी आढळुन आल्या. त्यानंतर प्रशासनाने दोन लॅब्स तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. याबराेबरच तीन लॅब्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (satara-breaking-news-two-covid19-test-lab-sealed-closed-not-followed-rat-icmr-guideliness)

शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये सर्वत्र शासकीय आणि खाजगी चाचणी केंद्रात रॅट चाचणी (RAT) सुरु करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन रुग्णांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार वेळेत होऊन मृत्यूच्या संख्येत घट होण्यासाठी या रॅट चाचणीची महत्वाची भूमिका आहे.

sealed
साता-यावर विशेष प्रेम असलेल्या पवारांकडून अपेक्षापुर्ती हाेईल?

जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णाले तसेच जिल्हा रुग्णालये या ठिकाणी रॅट चाचणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 59 खाजगी लॅब्स, कोविड हेल्थ सेंटर, कोवड हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रॅट चाचणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

sealed
कोरोनाबाधितांकडून 20 लाखांचं अधिकचं बिल; रक्कम परत करण्याचे हॉस्पिटल्सना आदेश

त्यांना दैनंदिन अहवाल ऑनलाईनच्या माध्यमातून आयसीएमआर पोर्टलवर जमा करण्याच्या सूचना तोंडी व लेखी वेळोवळी देण्यात आलेल्या आहेत. तरीही काहींनी चालढकल केली. त्यामुळे गंभीर त्रुटी असणाऱ्या लॅब्सवर कडक कारवाईचा इशारा देत त्या बंद करण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com