Woman Death in Accident : कारच्या धडकेत साताऱ्यात महिलेचा मृत्यू; पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
Satara Accident News : पावणेएकच्या सुमारास त्या माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्त्यावर तालुका पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच पोचल्या होत्या. चिरायू हॉस्पिटलच्या बाजूने येणाऱ्या एका कारने त्यांना आदर्श कॉर्नर बिल्डिंगजवळ जोराची धडक दिली.
A fatal car accident in Satara claims a woman’s life, highlighting concerns about pedestrian safety on busy roads.Sakal
सातारा : माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्त्यावरील चिरायू हॉस्पिटलकडून येणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरवर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. सरस्वती नंदू वायदंडे (वय ४५, रा. गुरुवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. त्या नगरपालिकेमध्ये कामाला होत्या.