Satara Traffic Issue : वाहनांच्या गर्दीत साताऱ्याचा कोंडतोय श्‍वास; रस्ते तेवढेच, कोंडी वाढतीच, शहर बससेवाच ठरणार उतारा

सातारा शहराचा विस्तार वेगाने होत असताना रस्त्यांची क्षमता मात्र त्या तुलनेत वाढलेली नाही.
Satara Traffic

Satara Traffic

sakal

Updated on

सातारा - शहरात नोंदणीकृत ३२ हजार ६५८ दुचाकींसह तब्बल ४६ हजार ६२ प्रवासी व मालवाहू वाहने आणि पाच हजार २३५ पर्यावरणपूरक वाहने रस्त्यावर धावत आहेत; परंतु रस्ते तेवढेच, पार्किंगची जागा मर्यादित आणि वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने साताऱ्यातील वाहतुकीचा प्रश्‍न आता कोंडीवरून एकमेकांना हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. अशा स्‍थितीत शहराचे स्‍वास्‍थ, शहरातील सलोखा आणि प्रत्‍येक शहरवासीयाला परवडेल, अशी वाहतूक यंत्रणा उपलब्‍ध करायची असेल तर शहर बस ही अपरिहार्य गरज बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com