ढेबेवाडीच्या पुलावर भर पावसात वाहन चालकांची सर्कस

राजेश पाटील
शुक्रवार, 10 जुलै 2020

ढेबेवाडीनजीक वांग नदीच्या पुलावर पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साठल्यास अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या पुलावर तयार झालेली पाण्याची डबली चुकवण्यासाठी वाहन चालकांची कसरत सुरू आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : रात्रंदिवस वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील ढेबेवाडीनजीकच्या वांग नदीच्या पुलावर पाण्याचा निचरा होत नसल्याने पाण्याची डबकी चुकविताना वाहन चालकांसह पादचाऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. गाळमिश्रित पाण्यामुळे पुलावर वाहने घसरत असल्याने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच बांधकाम विभागाने डोळे उघडावेत, अशी मागणी होत आहे. 

ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण आणि पावसाळ्यातील गैरसोय लक्षात घेऊन ढेबेवाडीजवळच असलेल्या कमी उंचीच्या पुलाच्या जागी नवीन उंच पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. अलीकडे पुलाच्या दुतर्फा असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने रस्ता रुंद व पूल अरुंद अशी विरोधाभासाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बांधकाम विभागाचे देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याने हा पूल पावसाळ्यात अपघाताला निमंत्रण देत आहे. पुलाच्या दुतर्फा असलेली झुडपे व गवताची नियमित सफाई केली जात नसल्याने वाहनांचा अंदाज येत नाही. पावसाळ्यात पुलावर सचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बसविलेल्या पाइप मातीने तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून रहाते. पाण्याची डबकी चुकवताना वाहनचालक व पादचाऱ्यांची कसरत होऊन अपघात होतात. सध्याही अशीच स्थिती तेथे आहे. गाळमिश्रित पाण्यामुळे पुलावर वाहने घसरत असल्याने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच बांधकाम विभागाने डोळे उघडावेत, अशी मागणी होत आहे. 

पुलाचे बांधकाम केल्यापासून प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या कायम आहे. अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या स्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. 

- कमलाकर पाटील, भाजप, माजी तालुकाध्यक्ष, पाटण 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

बंद ग्रंथालयांमुळे वाचन चळवळीला ब्रेक!, जिल्ह्यात 470 ग्रंथालये उघडण्याच्या प्रतीक्षेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Circus of motorists in heavy rain on Dhebewadi bridge