सातारा : पाण्‍यासाठी नागरिकांना वेठीस धरू नका

शिवेंद्रसिंहराजे; खंडित पाणीपुरवठ्याचा घेतला आढावा
शिवेंद्रसिंहराजे
शिवेंद्रसिंहराजेsakal
Updated on

सातारा : पूर्वसूचना न देता यशवंतराव चव्‍हाण सायन्‍स कॉलेजने काम सुरू केल्याने शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. वाहिनी फुटल्‍याने गेले पाच दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळित असून नागरिकांशी देणे-घेणे नसलेले पालिकेचे पदाधिकारी इकडे फिरकले नाहीत. नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून पुरस्कार घेण्यासाठी पुढे-पुढे करणारे पालिकेचे पदाधिकारी कुठे गेले, असा संतप्‍त सवाल आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणीदरम्‍यान केला. याचवेळी नागरिकांना वेठीस न धरण्‍याच्‍या सूचना प्राधिकरणास केल्‍या.

वायसी कॉलेजमध्ये बोटॅनिकल गार्डनच्‍या जागेसाठी सपाटीकरण करताना शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्‍य वाहिनी फुटली. यामुळे शहरातील पूर्व भागातील पाणीपुरवठा पाच दिवस विस्‍कळित झाला आहे. विस्‍कळित पाणीपुरवठा लवकर सुरळीत व्‍हावा तसेच दुरुस्‍तीच्‍या कामाची पाहणी आज शिवेंद्रसिंहराजेंनी केली. यावेळी माजी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, फिरोज पठाण, रवी पवार, पोपट मोरे, वायसीचे प्राचार्य बी. टी. जाधव, प्राधिकरणाच्या पल्‍लवी चौघुले व इतर अधिकारी उपस्‍थित होते.

वाहिनी फुटल्‍याने नागरिकांना पाच दिवस पाण्‍यासाठी भटकत फिरावे लागले. टेंडर, खाबुगिरीचा विषय असता तर पालिका पदाधिकारी इथे दिसले असते. पाणीटंचाई असताना सत्ताधाऱ्यांमधील एकहीजण इकडे फिरकला नाही. पुरस्कार घेण्यासाठी गेलेले आता कुठे आहेत, असा सवाल करत वाहिनीची तातडीने दुरुस्ती करून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्‍याच्‍या सूचना प्राधिकरणास त्‍यांनी यावेळी केल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kas Dam current water level in Satara
Mahabaleshwar traffic congestion latest news
Karad Krishna Sugar Factory election latest updates
latest Ambenali Ghat accident rescue news
Marathi News Esakal
www.esakal.com