कऱ्हाडकरांना आता रोज मिळणार जादा तीन लाख लिटर पाणी

Satara
Satara
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील पालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विद्यानगर, सैदापूर व गोळेश्वर भागातील तब्बल 525 नळ कनेक्‍शनधारकांचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. त्या ग्रामपंचायतींनी केलेल्या 24 तास पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असल्याने पालिका तेथील पाणीपुरवठा बंद करत आहे. त्यामुळे रोजचा तीन लाख 12 हजार 500 लिटर त्या भागात होणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे पुरवठा शहरातील नळ कनेक्‍शनधारकांना उपलब्ध व जास्त काळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिका करत आहे.

शहरात मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने तेथील पाण्याच्या तक्रारीही संपणार आहेत. सैदापूर, गोळेश्वरच्या हद्दीतील सुमारे 525 कनेक्‍शनचे कऱ्हाड पालिकेचे 17 लाखांचे पाणीपट्टीच्या करातून मिळणारे उत्पन्न कमी होणार आहे. तद्वत त्या भागात रोज होणारे तीन लाख लिटर, तर महिन्याला होणारा 93 लाख 75 हजार लिटर पालिकेच्या पाण्याची बचत होणार आहे. त्याचा शहरातील 13 हजार नळ कनेक्‍शनधारकांना फायदा होणार आहे. 

कऱ्हाड पालिकेतर्फे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी नऊ पाण्याच्या टाक्‍या आहेत. त्यातून रोज 18 दशलक्ष घन लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरात 13 हजार नळ कनेक्‍शनधारक आहेत. तब्बल एक हजार 625 नळकनेक्‍शन शहराबाहेर आहेत. त्याची आकारणी शहरात होणाऱ्या पाणीपट्टी आकारणीच्या दुप्पट आहे. विद्यानगर, सैदापूर, गजानन हाउसिंग सोसायटी, गोळेश्वर येथे पाणीपुरवठा केला जातो. शहरात दोन हजारांप्रमाणे पाणीपट्टी आकारली जाते. तीच आकारणी त्या भागात चार हजार आहे. त्यामुळे पालिकेचे त्या भागातून उत्पन्न बऱ्यापैकी आहे.

गजानन हाउसिंग सोसायटी येथे महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत स्वतंत्र पाण्याची टाकी पालिकेने बांधली आहे. त्याव्दारे गजानन हाउसिंग सोसायटी, गणपती मंदिर चौक, चवंडेश्वरीनगर, सोसायटीच्या पूर्व व पश्‍चिम भागाचा त्यात समावेश होतो. त्या टाकीची तब्बल दोन हजार नळ कनेक्‍शनची क्षमता आहे. त्यात सुमारे 1100 नळकनेक्‍शन आहेत. त्याव्दारे पालिकेला सुमारे 44 लाखांचे उत्पन्न मिळते. त्या सोबतच सैदापूर, विद्यानगर भागातही नळकनेक्‍शन पालिकेने दिले आहेत. त्या भागात तब्बल 400 नळकनेक्‍शन आहेत.

शहराच्या पूर्वेकडील गोळेश्वर गावातही पालिका पाणीपुरवठा करते, तेथेही 125 नळकनेक्‍शन आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणांहून पालिकेला सुमारे 17 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळते. सैदापूर, विद्यानगर व गोळेश्वर हद्दीत त्यांच्या ग्रामपंचायतींनी त्यांच्या 24 तास पाणी योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना त्या ग्रामपंचायतींचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे पालिका तेथील पाणीपुरवठा बंद करणार आहे. गोळेश्वर, विद्यानगर भागात 425 नळकनेक्‍शनला पालिकेला रोज तीन लाख 12 हजार लिटर पाणीपुरवठा करावा लागत होता. त्या भागात पाणीपुरवठा होत असल्याने त्याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर निश्‍चित परिणाम होत होता. त्यामुळे शहरातील काही भागात कमी दाबाने पुरवठा व्हायचा.

मात्र, आता ती तक्रार राहणार नाही. कारण सैदापूर व गोळेश्वरच्या हद्दीत केला जाणारा रोजचा तीन लाख 12 हजार लिटर पाणीपुरवठा बंद होऊन ते रोजचे पाणी शहरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरात मुबलक पाणी मिळणार आहे. शहराच्या पाण्याची गरज 18 लाख दशलक्ष घन लिटर आहे. ती आता क्षमतेने पूर्ण होणार आहे. त्याचे नियोजन पालिका स्तरावर सुरू आहे. सैदापूर, गोळेश्वरचे कमी झालेले पाणी शहरात कसे व्यापक वापरात येईल, याचे पालिकास्तरावर नियोजन सुरू आहे. त्यामुळे कऱ्हाडकरांना जास्त पाणी उपलब्ध होणार आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com