माणदेशावर कोरोनाचे संकट गडद

माणदेशावर कोरोनाचे संकट गडद
माणदेशावर कोरोनाचे संकट गडद
Updated on: 

दहिवडी (जि. सातारा) : येथील शिंदेमळा येथील 21 मे रोजी एक तरुण, आई-वडील व भावासह ठाण्याहून गावी आला. 23 मे रोजी त्याला तापाचा त्रास जाणवला. त्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्या वेळी औषधोपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. 25 मे ला पुन्हा त्याला खोकल्याचा त्रास जाणवला. त्या वेळीही त्याच्यावर औषधोपचार करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून 26 मे रोजी तो तरुण व त्याच्या वडिलांना येथील कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले. त्यानंतर त्या तरुणाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला. काल 29 मेच्या रात्री त्या स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शिंदेमळ्यासह दहिवडीत खळबळ माजली. 
त्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. 

प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, नगराध्यक्ष सतीश जाधव, मुख्याधिकारी संदीप घार्गे यांनी निकट सहवासितांना क्वारंटाइन करण्यासोबतच परिसराच्या सीमा बंद केल्या. या तरुणाच्या आईवडील, भाऊ, आजी-आजोबा यांच्यासह त्या तरुणाने ज्या रिक्षातून प्रवास केला, त्या रिक्षाच्या चालकाला क्वारंटाइन करण्यात येणार आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून आज 30 मेपासून सलग पाच दिवस संपूर्ण दहिवडी बंद करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष सतीश जाधव यांनी जाहीर केले असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

शिंदेमळ्याच्या एक किलोमीटर परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तो सर्व परिसर बंद करण्यात आला आहे. मात्र, यासाठी सातारा- सोलापूर या मुख्य मार्गावरील दहिवडी- पिंगळी बुद्रुक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुख्य रस्ताच बंद झाल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून दहिवडी-मायणी चौक-खांडसरी चौक तिथून पिंगळी बुद्रुक या मार्गाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
women hockey gold medal
Marathi News Esakal
www.esakal.com