
सातारा : ठेकेदार-अधिकाऱ्यांत अभद्र युती
सातारा: सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या काही महिन्यांत विविध योजनांतर्गत शहरातील विकासकामांच्या निविदा जाहीर केल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत सहभाग होऊन शेलकी कामे हातात घेणाऱ्या ठेकेदारांनी ती कामे अद्यापही प्रलंबित ठेवली आहेत. अलीकडच्या काळात बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे अनेक ठेकेदार कामे सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. अशा प्रकारे कामे सोडणाऱ्या ठेकेदारांवर सातारा पालिकेचा बांधकाम विभाग मेहरबान असल्याचे दिसून येते. बांधकाम विभाग आणि ठेकेदारांतील अभद्र युतीमुळे विकासकामे रखडल्याचे स्पष्ट होत आहे.
सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजना, नागरी अभियान, नगरोत्थान व इतर अनेक योजनांतील कामे प्रस्तावित केली आहेत. ही कामे प्रस्तावित करण्याच्या धोरणाला आगामी काळात होणाऱ्या सातारा पालिकेच्या निवडणुकीची झालर असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. निवडणुका नजरेसमोर ठेवत सातारा विकास आघाडीने विकासकामांचे शेकडो नारळ शहर
Web Title: Satara Controversial Between Contractors
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..