Satara : बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death news

Satara : बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचं निधन

केळघर :वरोशी (ता:जावळी) येथील रहिवासी व बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचे काल रात्री (मंगळवारी) वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना ठाणे येथे दुःखद निधन झाले असून यामुळे जावळी तालुका शोकसागरात बुडाला आहे. काल रात्री ठाणे येथे मोकाशी यांच्या राहत्या घरी त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बोंडारवाडी धरण कृती समितीच्या माध्यमातून गेल्या १३वर्षांपासून जावळी तालुक्यात ५४गावांसाठी लढणारे या चळवळीचे अर्धव्यु हरपले अशी भावना जावळी तालुक्यातील ५४गावांतील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. विजयराव मोकाशी यांच्या आकस्मित निधनामुळे मेढा व केळघर बाजारपेठ पूर्णपणे बंद असून चौका -चौकात मोकाशी यांच्या कार्याविषयी नागरिक चर्चा करताना दिसून येत होते.

वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना देखील मोकाशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी इच्छा व्यक्त केली होती. प्रतिकुल परिस्थितीत विजयराव मोकाशी यांचे नेतृत्व घडले आहे. वरोशी सारख्या छोट्याशा गावातून आयडीबीआय बँकेच्या उपमहाव्यवस्थापक पदापर्यंत मोकाशी यांचा प्रवास थक्क करणारा व स्वप्नवत आहे. सामान्य कुटुंबातील विजय मोकाशी यांनी आपल्या प्रेमळ व विनम्र स्वभावाने जावळी तालुक्यातील जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते.

त्यांच्या मूळ गावी वरोशी येथे ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतल्यावर केळघर-मेढा मार्गे संगम माहुली येथील स्मशानभूमीपर्यंत सजवलेल्या ट्रॉलीमधून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. विजयराव मोकाशी यांच्या अकाली मृत्यूमुळे बोंडारवाडी धरण कृती समितीचा मुख्य चेहरा काळाच्या पडद्याआड गेला असून गेल्या १३वर्षांपासून या धरणासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करणाऱ्या विजयराव मोकाशी यांनी धरण पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करून सलग १३वर्षे अविरत प्रयत्न मोकाशी यांनी केले.त्यांच्या मृत्यूनंतर धरणाचा लढा न थांबता धरणाचे काम पूर्णत्वास नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

Web Title: Satara Convenor Bondarwadi Dam Action Committee Vijayrao Mokashi Passed Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..