'जे जगात घडले नाही; ते भारतात घडले आहे'

prithviraj chavan
prithviraj chavansystem

मायणी (जि. सातारा) : कोरोना लशीच्या (coronavirus vaccination) बाबतीत केंद्र सरकारची (central government) परिस्थिती गोंधळाची असून, त्यामुळे अपरिमित जीवित हानी व आर्थिक नुकसान होत आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (congress leader prithviraj chavan) यांनी मोदी सरकारवर (narendra modi government) निशाणा साधला. (satara-coronavirus-news-prithviraj-chavan-criticises-narendra-modi-government-vaccination)

येथील डेडिकेटेड कोरोना सेंटरचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. त्या वेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक डॉ. एम. आर. देशमुख, कॉंग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, सरपंच सचिन गुदगे, माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख, प्रकाश कणसे, संजीव साळुंखे, शंकर माळी उपस्थित होते

prithviraj chavan
लसीकरणाअभावी 400 युवकांच्या नोकरी, शिक्षणाची झालीय अडचण

थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, दिवे लावा, अशा अवैज्ञानिक कृतीमुळेच सध्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका करून श्री. चव्हाण म्हणाले, ""लशीबाबत जगात जे घडले नाही. ते भारतात घडले आहे. त्यामुळेच लोकांचे जीव जात आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ते भरून निघणे कठीण आहे. केंद्र सरकार गोंधळलेल्या स्थितीत आहे.''

डॉ. येळगावकर म्हणाले, ""मेडिकल कॉलेजमध्ये डेडिकेटेड कोरोना सेंटर असूनही मायणी व खटाव तालुक्‍यातील रुग्णांना तेथे बेड मिळत नाहीत. उपचारासाठी अन्यत्र धावाधाव करावी लागत आहे. त्यावर पर्याय म्हणूनच येथील स्थानिक डॉक्‍टरांनी स्वतंत्र कोरोना उपचार केंद्र सुरू केले.''

दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, डॉ. येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, सचिन गुदगे, पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख, प्रांताधिकारी कासार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, डॉ. सुशीलकुमार तुरुकमाने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com