esakal | सातारा : यंदाही पालिकेतर्फे फिरते मुर्ती संकलन केंद्र
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा : यंदाही पालिकेतर्फे फिरते मुर्ती संकलन केंद्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्हाड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदाही होणारा गणेशोत्सवात निर्बंध आहेत. त्यामुळे पालिकेने याही वर्षी फिरती मुर्ती संकलन केंद्राची संकल्पना राबवली आहे. त्यासाठी १४ वॉर्डात १४ फिरती मुर्ती संकलन केंद्रे तयार अशणार आहेत. त्याशिवाय शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी २१ कृत्रीम तलावांची सोय तर दोन मोठ्या शेततळ्यांचीही व्यवस्था पालिकेने केली आहे. पालिकेचे तीनशे कर्रमचारी उत्सव काळात राबणार आहेत. आगामन ते विसर्जन या कालावधीत स्वच्छतेचेला प्राधान्य देवून पालिका विविध उपक्रम हाती घेणार आहे. त्याव्दारे स्वच्छतेचा संदे्शही देणार आहे.

हेही वाचा: शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्यासाठी 35 कोटी मंजूर

शहरात ३५०च्या आसपास सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. पाचव्या दिवसापासून विसर्जन सुरू होते. अनंत चतुर्दशीपर्यंत ते चालते. मागील वर्षापासून मिरवणुकांसह सगळ्याच गोष्टीवर निर्बंध आहेत. यंदाही ते कायम आहेत, मात्र यंदा शहरात ७० टक्के पर्यावरण पुरक गणेश मुर्ती आहेत. कुंभार गल्लीत यंदा शाडूच्या मुर्ती जास्त आहेत.

आगमनपासून विसर्जनपर्यंत पोलिस, पालिका संयुक्त कोरोनाचे निर्बंध पाळून उत्सवावर लक्ष ठेवून आहेत. यंदा २३४ सार्वजनिक तर २९ हजार घरगुती गणेशाच्या मुर्ती आहे. त्यापैकी एकही मुर्ती कृष्णा किंवा कोयना नदीत विसर्जीत होणार नाही, त्याची दक्षता पालिकेने घेतली आहे. त्यासाठी आरोग्य विभागातर्फे कृष्णा-कोयनेच्या वाळवंटात विसर्जनासाठीची तयारी सुरू आहे. परिसरातील झाडे झुडपे काढून स्वच्छता व सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता करीत आहेत.

हेही वाचा: सांगली : जिल्ह्यात आज महालसीकरण अभियान

परिसरात जेसीबीच्या साह्याने झाडे झुडपे काढून रस्ता सपाटीकरण सुरू आहे. शहरात घरगुती गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणी २२ जलकूंड उभारले आहेत. गतवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन जलकुंडात होणार आहे. याहीवर्षी प्रत्येक वॉर्डात फिरती मुर्ती संकलन तयार केली आहे. पालिकेचे कर्मचारी वॉर्डात जावून कर्मचारी मुर्तींचे संकलन करणार आहे. त्यासाठी ३०० पालिकेचे कर्माचारी उत्सव काळात राबणार आहेत.  

असे आहेत, विसर्जनासाठीचे जलकुंड

- सोमवार पेठ - कृष्णा घाट, भैरोबा गल्ली

- मंगळवार पेठ - कृष्णा नाका शेजारी, पी.डी. पाटील पाणी पुरवठा संस्था

- गुरूवार पेठ - मंडई पूर्व बाजू

- शुक्रवार पेठ  - रंगारवेस चौक, विठ्ठल चौक

- शुक्रवार पेठ -  पंपीग स्टेशन क्रमांक दोन शेजारी

- शनिवार पेठ - दत्त चौक, कोयनेश्वर मंदीर, दैत्यनिवारणी मंदीर, शाहू चौक, कोल्हापूर नाका, कार्वे नाका पाण्याची टाकी, पी.डी.   पाटील उदयान, मार्केट यार्ड गेट क्रमांक एक

- वाढीव हद्द - शिक्षक कॉलनी, दौलत कॉलनी, पोस्टल कॉलनी आणि खराडे कॉलनी

loading image
go to top