लॉकडाउन काळात आगळ्या प्रश्नमंजूषेची निर्मिती, सलग 100 दिवस उपक्रम

Satara
Satara
Updated on

सातारा : "शाळा बंद, मात्र शिक्षण सुरू' या मोहिमेला बळ देताना एका प्राथमिक शिक्षकाने सलग 100 दिवस आगळ्या प्रश्नमंजूषेचा उपक्रम राबविला. राज्यातील विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. 

नितीन आत्माराम जाधव हे या शिक्षकाचे नाव. ते सध्या जावळी तालुक्‍यातील शिवसागरालगत असलेल्या आपटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेला प्रश्नमंजूषेचा उपक्रम जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात कौतुकाचा विषय बनला आहे. उल्लेखनीय म्हणजे सलग 100 दिवस त्यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमात ते दररोज दहा प्रश्नांची निर्मिती करत. या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या दिवशी नवीन भागाबरोबर देण्यात येत. हे प्रश्न शैक्षणिक अभ्यासक्रम, संस्कृती, थोरांची ओळख, दिनविशेष, सामान्यज्ञान, जिल्ह्याची भौगोलिक माहिती यावर आधारित असत. त्यासाठी ते स्वतः विविध पुस्तके, संदर्भ साहित्य यांचा सखोल अभ्यास करत असत.

हे प्रश्न ते व्हॉट्‌सऍपचे शैक्षणिक गट, फेसबुक तसेच स्वतःच्या ब्लॉगवरून शेअर करत. या उपक्रमाला राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद लाभला. त्यातून एक हजार दर्जेदार प्रश्नांची निर्मितीही झाली. स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या युवकांनाही ती उपयुक्त ठरल्याचे श्री. जाधव यांनी नमूद केले. या उपक्रमाला जोडूनच त्यांनी विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा आयोजिली. त्यात तब्बल दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. हेच या उपक्रमाचे फलित मानले जात आहे. गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, उपशिक्षणाधिकारी हणमंत जाधव, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, केंद्रप्रमुख विजयकुमार देशमुख यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. 

""लॉकडाउन काळातील या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान मिळाले. विद्यार्थी स्वयंअध्ययनाशी जोडले गेले. अवांतर वाचन करू लागले. त्यांच्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावण्यासाठीही हा उपक्रम पूरक ठरला.'' 
-रमेश चव्हाण, 
गटशिक्षणाधिकारी, 
जावळी पंचायत समिती 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Cross-Voting Concerns Trigger BJP Strategy Ahead of Crucial MLC Election
Deadly Curve Claims Young Engineer’s Life During Weekend Road Trip to Ganpatipule
Satara
Marathi News Esakal
www.esakal.com