मयूर कणसे याचे मयुरी हिच्याशी २०१८ मध्ये लग्न झाले. त्यानंतर एकाच वर्षात त्यांच्यात वाद सुरू झाला.
विंग : पती-पत्नीच्या भांडणात (Husband and Wife Dispute) पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून (Murder Case) केला. विंग येथील विंग हॉटेल भागात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्या घटनेने खळबळ उडाली आहे. मयुरी मयूर कणसे (वय २७) असे मृत पत्नीचे नाव आहे. पती मयूर यशवंत कणसे (वय ३०) यास पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे.