सातारा : सायकल चोरीला गेलीय? मग, अशी मिळवा परत सायकल!

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : शहरात सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून 1.40 लाखांच्या तेरा सायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. 

शहरालगत असणाऱ्या विलासपूर (गोडोली) येथून 15 ऑक्‍टोबर 2020 रोजी दुपारी एक ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गणेश भगवान तळेकर (रा. शिवाजी चौक, विलासपूर, गोडोली) यांच्या घरासमोर लावलेली आठ हजार रुपये किमतीची सायकल अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. पाडळी येथील एकाने त्याच्या साथीदारासह विलासपूर येथील गणेश तळेकर यांची सायकल आणि सातारा शहरातून अन्य काही सायकली चोरलेल्या असून त्याच गावातील लोकांना विकल्या आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी माहितीची खातरजमा केली. त्यामध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा आणि त्याच्या दोन साथीदारांचा सहभाग असल्याचे समोर आले. 

त्या विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आल्यानंतर तिघांनी मिळून शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून सायकली चोरून नेल्या असल्याची माहिती मिळाली. एलसीबीने संबंधितांकडून सायकली जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत 1 लाख 40 हजार 500 रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी सातारा बाल न्याय मंडळाकडे केली होती. मात्र, त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. दरम्यान, सातारा शहर परिसरातून ज्या कोणाच्या सायकली चोरीला गेल्या असतील, त्यांनी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टीप : चोरीला गेलेल्या सर्व सायकली पोलिस मुख्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या एलसीबी कार्यालयाच्या बाहेर उभ्या करण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांच्या या सायकली आहेत, अशांनी सायकल खरेदीची मूळ पावती सोबत घेऊन एलसीबी कार्यालयात यावे व खातरजमा करुन आपली सायकल घेऊन जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com