कुरळोशी वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी गाढवलीच्या एकास कोठडी

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News
Updated on

केळघर (जि. सातारा) : कुरळोशी (ता. जावळी) येथील वनक्षेत्र हद्दीत वणवा लावल्याप्रकरणी गाढवली येथील एकावर गुन्हा दाखल झाला असून, मेढा न्यायालयाने आज संशयितास न्यायालयीन कोठडी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

कुरळोशी येथे वन खात्याच्या हद्दीत दोन फेब्रुवारीस वणवा लागल्याची माहिती वन विभागास मिळाली होती. वन कर्मचाऱ्यांनी येथे तत्काळ धाव घेऊन वणवा विझवला होता. त्याप्रकरणी अधिक तपास केला असता चंद्रकांत गेनू सपकाळ (रा. गाढवली, ता. जावळी) यांना संशयित म्हणून वन विभागाने ताब्यात घेऊन वणवा लागल्याच्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांनी सांगितले, की नजर चुकीमुळे माझ्या खाचरातून वणवा वन हद्दीत गेला. त्याठिकाणी वन कर्मचारी यांनी पाहणी करून व कागदपत्र तयार करून सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. वनक्षेत्रपाल रणजितसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा कुटे-सोडमिसे, वनरक्षक  रामचंद्र परधाने, वनपाल श्रीरंग शिंदे, व्ही. जी. बेलोशे, वनरक्षक भामघर यांनी हा गुन्हा उघडकीस आणून तपास केला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com