
गोडोली येथील एका युवकास मारहाण केल्याप्रकरणी आठ ते नऊ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : गोडोली येथील एका युवकास मारहाण केल्याप्रकरणी आठ ते नऊ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहन रमेश देवकुळे (रा. बीएसएनएल ऑफिस शेजारी, गोडोली) याने फिर्याद दिली आहे.
बुधवारी (ता. 13) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अभी रोकडे, सौरभ सोनवणे, राज यादव, मेहूल भागवत, कुणाल मुळे, सागर काशीद (सर्व रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, सातारा) व त्यांच्या तीन साथीदारांनी गोडोली येथील कृष्णकुंज अपार्टमेंटजवळच अडवून दांडके व हाताने मारहाण केली. त्यानंतर तू आमच्या इथल्या कुठल्यातरी मुलीवर लाइन मारतोस, अशी खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली, तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे रोहन याने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार मेचकर तपास करत आहेत.
शेट्टी, खोतांना शेतकऱ्यांविषयी काही देणं-घेणं नाही; पंजाबराव पाटलांची टीका
संपादन : बाळकृष्ण मधाळे