esakal | विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह करंजेतील पाच जणांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

फ्लॅटसाठी पैसे दिले नाही, म्हणून विवाहितेचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह करंजेतील पाच जणांवर गुन्हा

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : फ्लॅटसाठी पैसे दिले नाही, म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये पती हा रेल्वेमध्ये अधिकारी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

विशाल सुरेश पवार (वय 33), अलका सुरेश पवार (वय 55, दोघे रा. शाहूपुरी), अश्विनी घोलप (रा. कल्याण), प्रवीण ननावरे (वय 40), नमिता ननावरे (वय 38, दोघे रा. करंजे) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत प्राजक्ता विशाल पवार (मूळ रा. सासपडे, ता. सातारा सध्या रा. शाहूपुरी) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
डिसेंबर 2015 पासून ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत संशयितांनी शारीरिक, मानसिक छळ केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

उंब्रजमध्ये महामार्गावर चक्क वाहनतळ; पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

संपादन : बाळकृष्ण मधाळे