esakal | सागाच्या वाहतूकप्रकरणी पाचवडच्या एकावर गुन्हा; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

वन विभागाच्या गस्त पथकाला स्वप्नील बांदल हा टेंपो मधून सागाच्या जातीच्या लाकडाची वाहतूक करताना आढळला.

सागाच्या वाहतूकप्रकरणी पाचवडच्या एकावर गुन्हा; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : विनापरवाना सागवान लाकडांची वाहतूक करणाऱ्या एकावर दोन गुन्हे दाखल करून वन विभागाने 8 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्वप्नील प्रकाश बांदल (रा. मूळ अमृतवाडी, सध्या पाचवड ता. वाई) असे संशयिताचे नाव आहे. 

वनविभागास मिळालेल्या माहितीवरून, ता. 20 रोजी वाई-जांभळी रस्त्यावरील भोगाव गावच्या हद्दीत गस्त घालताना वन विभागाच्या गस्त पथकाला स्वप्नील बांदल हा टेंपो (एमएच 11 एएल 5988) मधून सागाच्या जातीच्या लाकडाची वाहतूक करताना आढळला. चौकशीनंतर त्याच्याकडे वनविभागाचा वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच गुन्ह्यात वापरलेला टेंपो साग जातीचे लाकूडमालासह जप्त करून ताब्यात घेण्यात आला. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा जागेवरच होणार फैसला; थेट महाव्यवस्थापकच येणार भेटीला!

या मालाची किंमत 3 लाख 15 हजार आहे. त्यानंतर ता. 24 रोजी मोती बाग परिसरातील धोम डाव्या कालव्याचे पुलाजवळ गस्त पथकाने स्वप्नील बांदल यास पुन्हा टेंपो (एमएच 12 एफसी 7361) मधून विनापरवाना सागवानाची वाहतूक करताना पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याने टेंपोमध्ये लाकूडमाल भरण्यासाठी वापरलेला ट्रॅक्‍टर (एमएच 14 एव्ही 9319) व मोबाईल जप्त करण्यात आला. या मालाची किंमत 5 लाख 54 हजार आहे. या कारवाईत वनपाल सुरेश पटकारे, संग्राम मोरे, वनरक्षक वैभव शिंदे, सुरेश सूर्यवंशी, संदीप पवार, प्रदीप जोशी, संजय आडे, अजित पाटील यांनी सहभाग घेतला. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल सुरेश पटकारे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे