इंदवलीत ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on: 

कुडाळ (जि. सातारा) : इंदवली (ता. जावळी) येथे काल (ता. 10) सायंकाळी पाचच्या सुमारास भरडी मशिनवर काम करताना ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. बबन शंकर शिंदे (वय 70) असे मृताचे नाव आहे. 

करहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी चारच्या सुमारास इंदवली येथील शिवारात गहू पिकाची भरडी मशिनने मळणी करताना ट्रॅक्‍टरला जोडलेल्या भरडी मशिनचा गिअर अचानक पडून ट्रॅक्‍टरने रेस घेतल्यानंतर पाठीमागे उभे असणारे बबन शिंदे हे ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील चाकाखाली सापडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. 

चिंताजनक! कऱ्हाडात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; आरोग्य विभागाकडून जोरदार हालचाली 

उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. बबन शिंदे हे इंदवली विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष होते, तसेच गावासह परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. "बापू' या नावाने ते परिसरात परिचित होते. करहर पोलिस ठाण्याचे शिंदे तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

women hockey gold medal
udaysinh patil undalkar
Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Marathi News Esakal
www.esakal.com