कोरेगावात बस-दुचाकीच्या धडकेत सायगावचा युवक ठार; पोलिस गंभीर जखमी

राजेंद्र वाघ
Saturday, 16 January 2021

कोरेगाव शहरातील देसाई पेट्रोल पंपासमोर भरधाव खासगी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सायगाव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

कोरेगाव (जि. सातारा) : शहरातील देसाई पेट्रोल पंपासमोर काल (शुक्रवार) सकाळी भरधाव खासगी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सायगाव (ता. कोरेगाव) येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले पोलिस हवालदार गंभीर जखमी झाले आहेत. 

ईश्वर चंद्रकांत घोरपडे (वय 30, रा. सायगाव, एकंबे, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. हवालदार मोहनकुमार हणमंतराव ढवळे (रा. पेठ किन्हई, ता. कोरेगाव) यांना गंभीर दुखापत झाली आहे. मोहनकुमार ढवळे हे ईश्‍वर यांच्या दुचाकीवरून कोरेगावला येत होते. त्या वेळी खासगी बसने जोरदार धडक दिली. याप्रकरणी बसचालक दीपक कृष्णा काटकर (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम तपास करत आहेत. 

आमच्या पोरीवर लाइन मारतोस; गोडोलीत युवकाला चोप; नऊ जणांवर गुन्हा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News One Person Died In Saigaon Bus Two Wheeler Accident