
लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोरे येथील वनरक्षकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.
कऱ्हाड (जि. सातारा) : लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोरे येथील वनरक्षकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. राहुल बजरंग रणदिवे (वय 34, रा. विलासपूर, गोडोली) असे संबंधित संशयिताचे नाव असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश जगताप यांनी दिली.
या घटनेने वन विभागात खळबळ उडाली आहे. लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी संबंधित वनरक्षक रणदिवे याने तक्रारदारास 25 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीअंती संबंधितात 15 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ते देत असताना वनरक्षक रणदिवे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक जगताप, श्री. ताटे, श्री. खरात, श्री. येवले यांनी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा, पोलिस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या घटनेने वन विभागात खळबळ उडाली आहे.
जादा पैशांच्या आमिषाने डॉक्टर, उद्योजक, बिल्डरांची फसवणूक; मुंबईतून सातारकरांना कोट्यवधींचा गंडा