फाळणी नकाशाची नक्कल काढून देण्यासाठी घेतली 'लाच'; वाईतील लिपिकाला चार वर्षे दंडात्मक शिक्षा

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on: 

वाई (जि. सातारा) : फाळणी नकाशा नक्कल काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वाई भूमीअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कृष्णात यशवंत मुळीक या लोकसेवकास नुकतेच सातारा येथील विशेष न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी ठरवून चार वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

याबाबतची माहिती अशी, मुळीक याच्याकडे सातारा येथील भूमीअभिलेख कार्यालयात कार्यरत असताना तक्रारदार यांनी कोंडवे (ता. सातारा) येथील गट नंबर 179 चा फाळणी नकाशा काढून देण्यासाठी अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी मुळीक याने त्यांच्याकडे 12 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. दरम्यान त्याची बदली वाई येथे झाली. त्यामुळे तक्रारदाराने त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी मुळीक यांनी अर्ज आपल्याकडेच असून, हे काम करून देणार असल्याचे सांगून वाई येथे बोलाविले. त्यानंतर तडजोडीअंती ठरल्याप्रमाणे 1/9/2014 रोजी कारमध्ये (क्र.एम.एच.11/एके 9978) बसून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुळीक याला सातारा लाचलुचपत विभागाने पकडले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई तत्कालीन पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी केली होती. 

या गुन्हाचा पुढील तपास श्री. पाटील यांनी केला होता. सातारा येथील विशेष न्यायालयात गुन्ह्याच्या खटल्याचे कामकाज सुरू होते. आज विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी या खटल्याचा न्यायनिर्णय देऊन त्यामध्ये आरोपी लोकसेवक छाननी लिपिक कृष्णात मुळीक याला दोषी ठरवून 3 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास दोन महिने सक्तमजुरी तसेच कलम 13(1)(ड) अन्वये चार वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास दोन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी व सहायक सरकारी वकील लक्ष्मण खाडे यांनी काम पाहिले. त्यांना सातारा लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के व सहायक पोलिस निरीक्षक विजय काटवटे यांनी मदत केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khambatki Ghat traffic jam latest news
Farmers Demand ₹5,500 Per Tonne for Sugarcane
cotton cultivation in Phaltan taluka 2026
Raju Shetti warning to sugar factories
Marathi News Esakal
www.esakal.com