सातारा : शहर परिसरातील दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. संगमनगर येथील घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व इतर साहित्य असा सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे..याबाबत बेगम नजीर शेख (रा. संगमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांनी घराचे सेफ्टी लॉक तसेच लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील बल्ब, लॉक व रोख रक्कम असा १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार गोसावी तपास करत आहेत..Satara News शंभर कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा... .दुसरी घरफोडी तामजाईनगर परिसरात झाली आहे. याबाबत परवीन सिकंदर भालदार (रा. आदर्श कॉलनी, तामजाईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमधील गोदरेज कपाटातून त्यांनी आठ जोडे चांदीचे वाळे, दहा जोड पैंजण, आठ बिंदी, गणपतीची फ्रेम, अर्धा तोळे सोन्याचे वेढणे, आठ ग्रॅम सोन्याच्या आठ अंगठ्या, सोन्याच्या तारा, चांदीची अत्तरदाणी व उदबत्ती स्टॅण्ड असा सुमारे ६३ हजार रुपयांचा ऐवज लपांस केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार मोहरे तपास करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.