

Satara
esakal
दहिवडी: येथील नगरपंचायतीचे आरोग्य सभापती सुरेंद्र मोरे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी केली. बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी बेडरूममधील दोन लहान तिजोऱ्या पळवून नेल्या. या तिजोऱ्यांमधील तीन लाख ४१ हजार ९०० रुपयांची रोकड आणि अकरा तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने, दोन स्मार्ट वॉच व कागदपत्रे असा एकूण आठ लाख ९२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.