पुढच्या बुधवारपासून तूरडाळ 55, तर चणाडाळ 45 रुपये किलो दराने मिळणार; काेणाला सविस्तर वाचा

पुढच्या बुधवारपासून तूरडाळ 55, तर चणाडाळ 45 रुपये किलो दराने मिळणार; काेणाला सविस्तर वाचा
Updated on

सातारा : कोरोनाच्या काळात शासनाने तांदूळ, गव्हासोबत चणाडाळ व तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्याला मार्च, मे, जून या तीन महिन्यांसाठी 1207 मेट्रिक टन चणा व तूरडाळ उपलब्ध केली होती. यामध्ये प्रत्येक कार्डधारकाला एक किलोप्रमाणे ही डाळ प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदयचे लाभार्थी यांनाच मिळणार आहे. त्यासाठी रेशनकार्डची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झालेली असणे आवश्‍यक आहे. काही तालुक्‍यांतील रेशन दुकानांत अद्याप चणा व तूरडाळ पोचलेली नाही. तांदूळ, गव्हासह डाळही केशरी कार्डधारकांनाही उपलब्ध करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
 
कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गहू, तांदूळ उपलब्ध करून दिले. सुरवातीला प्राधान्य कुटुंबांना त्यानंतर मागणी वाढल्याने केशरी शिधापत्रिका धारकांनाही स्वस्तात गहू, तांदुूळ उपलब्ध केला. मात्र, काही तालुक्‍यांत धान्य पोचूनही ते लाभार्थ्यांपर्यंत पोचले नाही. त्याऐवजी ते आटाचक्की तयार करणाऱ्या कंपनीच्या एजंटाकडे गेल्याची चर्चा झाली. मात्र, याचा शोध पुरवठा विभागाने घेतला नाही. तरीही कोरोनाच्या संसर्गाच्या परिस्थितीत जनतेने तक्रार करण्याऐवजी मिळेल तेवढे धान्य घेऊन समाधान मानले. त्यानंतर शासनाने पुरवठा विभागाच्या माध्यमातून मोफत चणा व तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्याला 1207 मेट्रिक टन दोन्ही प्रकारच्या डाळी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये 483 मेट्रिक टन तूरडाळ तर 724 मेट्रिक टन चणाडाळीचा समावेश आहे. तूरडाळीचा संपूर्ण कोटा उपलब्ध झाला आहे. पण, चणाडाळ 559 मेट्रिक टन उपलब्ध झाली आहे. ही डाळ एप्रिल, मे आणि जून महिन्यांसाठी असून, प्रतिकार्ड एक किलोप्रमाणे वितरित केली जात आहे. त्यानुसार रेशन दुकानाच्या माध्यमातून ही डाळ प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदयचे लाभार्थी यांना मोफत दिली जात आहे.
 
गव्हाप्रमाणे तूरडाळ व चणाडाळीला पाय फुटण्याची शक्‍यता आहे. सध्यातरी काही तालुक्‍यांत अद्याप लाभार्थ्यांपर्यंत डाळ पोचलेली नसल्याच्या तक्रारी आहेत. पण, कोरोनाच्या संकटाच्या काळात जनता तक्रार करण्यास पुढे येत नाही. मिळाले ते पावले अशा भूमिकेत जनता असल्याने डाळीला पाय फुटण्यापूर्वी ती लाभार्थ्यांपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. 

जुलैपासून सर्वांनाच स्वस्तात डाळ 

सध्या रेशन दुकानांतून मोफत मिळणारी चणा व तूरडाळ केवळ एप्रिल, मे व जून या कालावधीतील असून, ती प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना मोफत दिली जात आहे. जुलैपासून सर्वांनाच स्वस्तात रेशन दुकानातून देण्यात येणार आहे. त्यासाठी तूरडाळीला 55 रुपये किलो, तर चणाडाळीला 45 रुपये किलो दर असेल, असे पुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादीची राष्ट्रवादीकडूनच धुळधाण... भाजपला अच्छे दिन

ब्रेकिंग : सारी, काेराेनामुळे फलटण तालुक्यातील एकाचा मृत्यु 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sowing Season Worry: ‘Certified’ Seeds Allegedly Fail Quality Test
Shovels in Hand, Change in Action: Women’s Collective Effort Wins Praise
Koyna Dam submerged villages history
Farmers Rejoice as Persistent Rain Boosts Water Levels in Koyna Catchment
Marathi News Esakal
www.esakal.com