Satara : विकासकामांचा ओघ थांबवू नका ; चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार पृथ्वीराज चव्हाण

Satara : विकासकामांचा ओघ थांबवू नका ; चव्हाण

उंडाळे : म्हासोली येथे विशेष प्रयत्न करून प्राथमिक आरोग्य केंद्राची दुमजली इमारत उभी राहिली. हे काम मार्गी लागावे, यासाठी विलासकाकांनी प्रयत्न केले होते. आरोग्य केंद्राची इमारत उभारल्याने काकांचे स्वप्नपूर्ती झाली, याचे समाधान वाटते. या गावातील उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. माझ्या माध्यमातून येणाऱ्या विकासाचा ओघ थांबवू नका, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

म्हासोली (ता. कऱ्हाड) येथे माजी सहकार मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पावणेपाच कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उद्‌घाटन, म्हासोली विकास सेवा सोसायटी इमारत भूमिपूजन व नूतन संचालक मंडळाच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, शिवाजीराव मोहिते, नरेंद्र नांगरे-पाटील, काशिनाथ कारंडे, तुकाराम पाटील, उदय पाटील, नितीन थोरात, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. जे. पाटील, आबासाहेब शेवाळे, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव शेवाळे, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष ब. ल. पाटील, उपाध्यक्ष तानाजी पाटील, मनवचे सरपंच पांडुरंग डांगे, येळगावच्या सरपंच अनुराधा माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे, डॉ. पियुशा शिंदे, म्हासोलीच्या सरपंच सुनीता घारे, माजी सरपंच शकुंतला पाटील, गणेशवाडीचे सरपंच बाळासाहेब माने, प्रमोद थोरात यांची उपस्थिती होती.

उदयसिंह पाटील म्हणाले, ‘‘विचारधारेतून विकासाची ऊर्जा येते. विलासकाकांनी विकासाच्या अधिष्ठानावर माणसे उभी केली. यामुळे हा मतदारसंघ येथून पुढेही राष्ट्रीय विचाराला साथ देईल.’’ या वेळी म्हासोली विकास सेवा सोसायटीचे नूतन अध्यक्ष राजेंद्र काटकर, उपाध्यक्ष उदय पाटील व सर्व संचालकांचा सत्कार झाला.

विकास पाटील, धनाजी काटकर यांची भाषणे झाली. उपसरपंच विनय पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र काटकर, निवास पाटील, धनाजी पाटील, दादासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. विनय पाटील यांनी प्रास्ताविक केले. उल्हास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब पाटील यांनी आभार मानले.