Satara : माध्यमे राज्यकर्त्यांना दिशा दाखवितात : चंद्रकांत पाटील

साताऱ्यात डिजिटल मीडिया अधिवेशन
Satara Digital Media Convention Chandrakant Patil
Satara Digital Media Convention Chandrakant Patil
Updated on

सातारा : समाज व राज्यकर्त्यांना योग्य दिशा दाखविण्याचे काम माध्यमे करत असून यापुढेही माध्यमांनी असेच काम करावे, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अधिवेशनासाठी शुभेच्छासंदेश पाठविला होता. त्यात त्यांनी म्हटले की डिजिटल मीडिया कोणतीही बातमी क्षणात लोकांपर्यंत पोचवीत आहे. ग्रामीण व शहरी भाग डिजिटल मीडियाशी जोडला आहे.

माहिती पोचविण्याच्या स्पर्धात्मक युगात डिजिटल मीडियाने विश्वासार्हता निर्माण करावी. या माध्यमांतील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com