udaysinh patil undalkar
sakal
कऱ्हाड - सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड हा सहकारातील सत्ताबदल नसून विलासकाकांनी ५३ वर्षांत निर्माण केलेला सहकारातील दबदबा कायम राखण्याची संधीच त्यांना यानिमीत्ताने मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटलांनी उंडाळकरांना दिलेल्या संधीने त्यांच्या राजकीय पुनरागमनावर शिक्कामोर्तब होवुन राजकीय वाटचालीलाही नवी उभारी मिळणार आहे. विलासकाकांच्या सहकारातील वारशाला उजाळा मिळुन त्यांच्या बॅंकेतील योगदानाची पोहचपावतीच अध्यक्षपदाच्या रुपाने ॲड. उंडाळकरांना मिळाली आहे.