Satara District Bank Election: थकीत शिक्षण निधीने ठरावांपुढे अडचण?; जिल्ह्यातील ४०६ संस्थांकडून १८ लाखांचा भरणा; ५५ संस्थांवर आता टांगती तलवार

406 Cooperative Societies Pay Pending Education Fund: जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदार यादीवर हरकतीनंतर ४०६ सहकारी संस्थांनी १८.०३ लाखांचा शिक्षण निधी भरला.
Satara District Bank Election

Satara District Bank Election

esakal

Updated on: 

सातारा: जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार दाखल झालेल्या हरकतींमध्ये ज्या सहकारी संस्थांचे ठराव करण्यात आले आहेत. त्यापैकी अनेक संस्थांनी शिक्षण निधी भरलेला नसल्याने अशा संस्थांचे ठराव बेकायदेशीर असून, ते अपात्र ठरवून त्यांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळावित, अशी हरकत अतिरिक्त निबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com