

Uday Singh Patil-Undalkar celebrates his victory in the Satara District Bank election.
esakal
कऱ्हाड: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी गटातील लढतीने तालुक्यातील भोसले-उंडाळकर गटाच्या ताकदीवर शिक्कामोर्तब झाले. रयत संघटनेचे प्रमुख अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष धनंजय पाटील-आटकेकर यांचा ५५ मतांनी पराभव करुन जिल्हा बॅंकेत इंट्री केली आहे. कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले यांची मिळालेली साथ उंडाळकरांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर गटाने केलेला मदतीचा पैरा जिल्हा बँकेतील विजयाच्या रुपाने भोसले गटाने फेडल्याचेच या निकालातुन स्पष्ट झाले आहे.