Jaykumar Gore statement on Satara District Bank election
esakal
सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे (Satara District Bank Election) पाळला. मात्र, मित्रपक्षांकडूनच काही ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. काही जागांवर महायुतीतीलच घटक पक्षांनी दगाफटका केल्याचे दिसून येत आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली असती, तर जिल्हा बँकेत विजय मिळविला असता, असे सांगत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांच्या भूमिकेवर निशाणा साधला.