

Koregaon Bank Election Result Sunil Mane Wins as 44 44 Vote Tie Leads to Lucky Draw in Satara District Bank Polls
esakal
कोरेगाव : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाच्या सुनील माने आणि भारतीय जनता पक्षाच्या सुनील खत्री या दोन मित्रांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल अखेर "ईश्वर चिठ्ठी"वर लागला. श्री. माने विजयी झाले. "राष्ट्रवादी"कडे अधिकची मते असताना त्यांची मते फुटल्याचे स्पष्ट झाल्याने हा निकाल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना आत्मचिंतन करायला लावणारा,तर भाजपला बळ देणारा ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.