पगारदारांनो... सातारा जिल्हा बॅंकेने आणली तुमच्यासाठी अनाेखी याेजना

पगारदारांनो... सातारा जिल्हा बॅंकेने आणली तुमच्यासाठी अनाेखी याेजना
Updated on

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत पगार जमा होणारे सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, सहकारी संस्था यामधील कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पगारदार खातेदार व बॅंकेचे सर्व सेवक यांच्यासाठी बॅंक एकत्रित वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी सुरू करीत आहे. या पॉलिसीमध्ये बॅंकेत पगार होणाऱ्या जास्तीत जास्त खातेदारांनी सहभागी होऊन विमा संरक्षित व्हावे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. 

जिल्हा बॅंकेच्या वैयक्तिक विमा योजनेचा प्रारंभ श्री. भोसले यांच्या हस्ते पहिला धनादेश देऊन करण्यात आला. या वेळी बॅंकेचे संचालक आमदार शशिकांत शिंदे, दत्तानाना ढमाळ, प्रकाश बडेकर, अर्जुनराव खाडे, अनिल देसाई, राजेश पाटील, कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, टाटा एआयजी विमा कंपनीचे अधिकारी विश्वास तांबे, ओंकार साबळे व बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मसूर विभागात कोरोनाबाधितांची शंभरी पार, आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू 

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,"" या पॉलिसी अंतर्गत अपघात विमा घेणाऱ्या व्यक्तीला अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास वारसाला विमा क्‍लेम रक्कम प्राप्त होणार आहे. यासाठी बॅंकेने टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीची निवड केली आहे. पॉलिसीमध्ये सहभागी होणाऱ्या पॉलिसीधारकांना जास्तीत- जास्त 30 लाखांपर्यंत अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. विमा संरक्षित रक्कम पगारदार सेवकाच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून आहे. पगारदार खातेदाराच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट किंवा जास्तीत- जास्त 30 लाख एवढी विमा संरक्षित रक्कम निश्‍चित करता येणार आहे. त्याचप्रमाणे या खातेदारांना त्यांचे खात्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना दोन लाख व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना दोन लाख असे एकूण 34 लाखाचे अपघात विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.''

कोरोनाशी लढा : बीड पोलीसांसाठी स्वतंत्र ‘आत्मनिर्भर’ विलगीकरण कक्ष 

डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले,"" या योजनेत विहित नमुन्यातील संमती पत्र भरून सहभागी होणाऱ्या पगारदार खातेदारास एक लाख विमा संरक्षित रकमेसाठी वार्षिक 22 रूपये इतका नाममात्र प्रिमियम भरावा लागणार आहे. या अनुषंगाने पगारानुसार होणाऱ्या विमा संरक्षित रकमेवर जास्तीत जास्त 660 रूपयात 30 लाख, दोन्ही प्रधानमंत्री विमा योजनेसाठी 342 रूपयांत चार लाख असे एकूण 1002 हप्त्यामध्ये एकत्रित 34 लाख रुपये विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.'' 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com