
सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साठलेले सांडपाणी परिसरातील कॉलन्यांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होत असून, साथरोग वाढण्यासाठी हे सांडपाणी धोकादायक ठरणार आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने या परिसराची स्वच्छता करून सांडपाण्याच्या निचऱ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.