esakal | साताऱ्यासह महाबळेश्वरात धुवांधार; जिल्ह्यात 8.2 MM पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain In Satara

सध्या राज्यभरात धुवांधार पावसाला सुरुवात झाली असून साताऱ्यासह कराड, पाटण, महाबळेश्वरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

साताऱ्यासह महाबळेश्वरात धुवांधार; जिल्ह्यात 8.2 MM पावसाची नोंद

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : सध्या राज्यभरात धुवांधार पावसाला (Heavy Rain In Satara) सुरुवात झाली असून साताऱ्यासह कराड, पाटण, महाबळेश्वरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना (farmer) थोडाफार दिलासा मिळाला असला तरी, या भागातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट ओढावले आहे. सातारा जिल्ह्यात आज (सोमवार) सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 8. 2 मिली मीटर पाऊस पडला असून आत्तापर्यंत सरासरी 90.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. (Satara District Received An Average Rainfall Of 8.2 MM bam92)

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आत्तापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 6.4 (260.9) मि. मी., जावळी- 9.4 (91) मि.मी., पाटण-10.3 (103.1) मि.मी., कराड-6.1(53.6) मि.मी., कोरेगाव-5.1 (71.9) मि.मी., खटाव-4.3 (35.6) मि.मी., माण- 5.6 (113.1) मि.मी., फलटण- 1.8 (64.2) मि.मी., खंडाळा- 0.5 (41.2) मि.मी., वाई-10.9 (95.2) मि.मी., महाबळेश्वर-49.9 (497.6) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Satara District Received An Average Rainfall Of 8.2 MM bam92

loading image