कऱ्हाड : फटाक्यांच्या विक्रीला परवानगी तर उडविण्यास बंदी

शहरात फटाके उडविण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
FATAKE
FATAKE sakal
Updated on: 

कऱ्हाड : येथील पालिकेने फटाके स्टॉल उभारण्यास परवानगी दिली अशतानाच दुसरीकडे शहरात फटाके उडविण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी त्याची नोटीस जारी केली आहे. माझी वसुंधरा अभियानाचा भाग म्हणून शहारात फटाक्यांना बंदी घातल्याचे त्यात स्पष्ट केले आहे. जुलै 2021 मध्ये झालेल्या मासिक बैठकीत फटाक्यांवबर बंदीचा ठरावही घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आङे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरात नागरिक विविध कार्यक्रमासहीत सण साजरे करण्यासाठी फटाक्यांचा वापर करत आहेत. त्याचा परिणाम प्राणी व वनस्पतींवर होत आहे. त्यांना त्या गोष्टी हानीकारक आहेत. पालिकेचे माझी वसुंधरा अभियानाचा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध केला आहे, अशी नोटीस मुख्याधिकारी डाके यांना काढली असून त्यात नागरिकांनी त्याची अंमलबजावणी करावी असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे.

FATAKE
पुण्यात किरण गोसावीवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल

पालिकेने नाटीशीव्दारे केलेल्.या जाहीर आवाहनात म्हटले आहे की, म्हटले आहे, पालिकेची 15 जुलै रोजी विशेष सभा झाली त्या विशेष सभे ठराव झाला आहे. त्याचा क्रमांक 4 / 27 आहे. त्या ठारावानुसार माझी वसुंधरा अभियानातंर्गत शहरातील नागरिकांना फटाके फोडण्यास बंदी गातली आहे. त्या आवाहानाव्दारे नागरीकांना कळविण्यात आले आहे की, शहरात विविध कारणाने फटाके फोडले जातात. त्याव्दारे कार्बन आणि सल्फर वातावरणात पसरून प्रदुषण निर्माण होते आहे. त्या व्दारे विषारी वायूंची तयार होत आहे.

तो वायू वनस्पती आणि प्राण्यांनाही हानिकारक आहे. त्यामुळे माझी वसुंधरा अभियानाचा भाग म्हणून शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध जाहीर केला आहे. नागरिकांनी त्यांची अंमलबजावणी करावी, शी विनांती मुख्याधिकारी डाके यांनी नोटीस वजा आवाहानाव्दारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sugar Mill Opening
women hockey gold medal
udaysinh patil undalkar
Sangli District Bank Election
Marathi News Esakal
www.esakal.com