कोरोना सेंटरमध्ये डॉक्‍टर हजर, औषधे गैरहजर!

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाबाधित रुग्णांच्या आयसोलेशनसाठी पार्ले येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे सिमटम्स नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात येते. मात्र, अनेकदा अचानक रुग्णांना काही ना काही त्रास सुरू होतो. तेथून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येते. तेथेही बेडसाठी मोठी वेटिंग लिस्ट असते. त्यामुळे लवकर बेड मिळत नाही. परिणामी संबंधित रुग्णाला विनाऔषधाचे तसेच काही दिवस काढावे लागतात. त्यामध्ये काही रुग्ण सिरीयस होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पार्ले कोविड सेंटरमध्ये तातडीने औषधोपचाराची व्यवस्था करण्याची गरज आहे. 

पार्ले सेंटरमध्ये सिमटम्स नसलेल्या रुग्णांना ठेवले जाते. ज्यावेळी रुग्ण तेथे जातो त्यावेळी त्याची तब्येत चांगली असते. मात्र, काही दिवसांनी तब्येत बिघडत चालल्याची उदाहरणे घडली आहेत. तब्येत बिघडल्यावर त्यांना कोविड सेंटरमध्ये औषधोपचार केला जात नाहीत. तसेच तेथे पूर्वी ऑक्‍सिजनचीही सोय नव्हती. मात्र, रुग्णांची प्रकृती बिघडल्यावर त्यांची ऑक्‍सिजन लेव्हल कमी आल्यावर त्यांना तातडीने अन्य रुग्णालयात हलवावे लागते. त्याचा विचार करून मध्यंतरी तेथे ऑक्‍सिजनची सोय करण्यात आली आहे. मात्र, तेथे औषधोपचासाठीही यंत्रणा कार्यान्वित नाही. 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या काही डॉक्‍टरांनी काही काळासाठी कोरोनात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचा विचार करून संबंधित सेंटरमध्ये फिजिशियन डॉक्‍टर तेथे नेमण्याची गरज आहे. त्यांची तेथे भेट झाल्यावर त्रास असणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार होऊन त्यांना बरे होण्यातही मदत होणार आहे. 


प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज 

पार्लेतील कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्याची चांगली सोय झाली आहे. तेथे रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्‍टरही कार्यरत आहेत. मात्र, तेथे औषधेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आता प्रांताधिकारी यांनीच त्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय होऊन रुग्ण तातडीने बरे होण्यासही मदत होणार आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com