Shambhuraj Desai : "पाच हजार ही केवळ सुरुवात, पूर्ण मदत मिळणार"; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शंभूराज देसाईंचा मोठा दिलासा, सरकार सोबत असल्याचीही दिली ग्वाही

Shambhuraj Desai Celebrates Diwali with Farmers in Satara : साताऱ्यातील माण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी साजरी केली. पाच हजारांची अग्रिम मदत अंतिम नसून पंचनाम्यानंतर पूर्ण मदत देण्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
Shambhuraj Desai Diwali with farmers in Satara

Shambhuraj Desai Diwali with farmers in Satara

esakal

Updated on: 

दहिवडी (जि. सातारा) : महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून जात असताना या संकटकाळात सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी पालकमंत्री देसाई यांनी माण तालुक्यातील पिंपरी गावाच्या शिवारात एका झाडाखाली घोंगडीवर बसून थेट शेताच्या बांधावरच फराळ खाऊन दिवाळी साजरी (Shambhuraj Desai Diwali with farmers in Satara) केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे, बाळासाहेब मुलाणी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Farmer Relief Update 48 Lakh Marathwada Farmers Eligible for 5000 Rupees Advance Aid Before Diwali
Shambhuraj Desai Satara District Bank election victory
shambhuraj desai and raju shetty
shambhuraj desai, cm devendra fadnavis and eknath shinde