आगाशिवच्या पायथ्याला घनकचऱ्याचे ग्रहण, मद्यपींचाही वाढलाय वावर

Satara
Satara
Updated on: 

विंग (जि. सातारा)  : पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्व आलेल्या येथील आगाशिव पायथा परिसराला घनकचऱ्याची नजर लागली आहे. अज्ञातांनी तो उघड्यावर फेकला आहे. वनहद्दीत मद्यपींचा वावरही तिकडे वाढला आहे. झुडपाआड पार्ट्यांमुळे बाटल्यांचे खचही पडलेले आहेत. त्यामुळे पर्यटनाला धोका निर्माण झाला असून, निसर्गप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त करताना कारवाईची आग्रही मागणी होत आहे. 

पर्यटनाच्या दृष्टीने येथील आगाशिव डोंगराला अधिक महत्त्व आले आहे. पर्यटक वारंवार भेटी देत आहेत. कऱ्हाड-पाटण तालुक्‍यातील पर्यटकांचा ओढा सतत वाढतो आहे. पायथा ते माथा हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांना साद घालत आहे. उंचावरून निसर्गरम्य परिसर न्याहळताना मनाला भुरळ पाडत आहेत. मात्र, याच आगाशिवला आता घनकचऱ्यामुळे नजर लागली आहे. विंग-धोंडेवाडी रस्त्यावर वनहद्दी परिसरात उघड्यावर तो फेकला आहे. गाठोड्यात बांधलेली जुनी कपडे यांसह घरगुती अन्य साहित्याचा त्यात समावेश आहे. बघताक्षणी मनात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यामुळे आहे. तसेच वनहद्दीत मद्यपींचा वावर अनेक दिवसांपासून आहे. झुडपाआड त्यांच्या वारंवार पार्ट्या घडत आहेत. याची निसर्गप्रेमींत मोठी चर्चा आहे. प्रत्येक ब्रॅंडच्या बाटल्यांचे खच त्याठिकाणी पडले आहेत. येण्या-जाण्याच्या वाटेवरच हे चित्र सहज दृष्टीस पडत आहे. मॉर्निंग वॉकला जाणारांची सतत वर्दळ तिकडे असते. विंग-धोंडेवाडी रस्त्यावरून प्रवाशांची वर्दळ असताना ते ठिकाण हाकेच्या अंतरावर आहे. तरीही मद्यपी कुणालाही जुमानत नाहीत. सायंकाळी उशिरापर्यंत मद्यपानाचा कार्यक्रम त्याठिकाणी सुरू असतो. 

कायदेशीर कारवाईची मागणी 

आगाशिवला ऐतिहासिक वारसा आहे. डोंगरात बौद्धकालीन लेण्या विखुरल्या आहेत. डोंगरमाथ्यावर प्राचीन महादेव मंदिर आहे. दर्शनासाठी व निसर्गछटांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ सतत असते. मात्र, येण्या-जाण्याच्या निसर्गवाटेवरील हे चित्र मनात विकृतीचे दर्शन घडवत आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी निसर्गप्रेमींतून सतत होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com