कोरोनामुक्त आईच्या कुशीत नवजात बाळ विसावले

कोरोनामुक्त आईच्या कुशीत नवजात बाळ विसावले
Updated on: 

कऱ्हाड ः सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील कोरोनामुक्त आठ रुग्णांना येथील कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात आज (बुधवार) डिस्चार्ज मिळाला. यात गलमेवाडी (ता. पाटण) येथील बाधित गर्भवती महिलेची प्रसूती केलेल्या महिलेचाही समावेश आहे. तिला आज डिस्चार्ज मिळाल्यावर नवजात बालक तिच्याकडे सुपूर्द केले. "कृष्णा'मधून आजअखेर कोरोनामुक्त होऊन 170 रुग्ण घरी गेले आहेत.
 
गेल्या चार दिवसांत जिल्ह्यातून सुमारे सव्वाशे रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कृष्णा रुग्णालयातून आज आठ जणांना डिस्चार्ज मिळाला. त्यात कऱ्हाड तालुक्‍यातील नांदगाव येथील 67 वर्षीय पुरुष, कुंभारगाव (ता. पाटण) येथील 70 वर्षीय पुरुष, दहिवडी (माण) येथील 50 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय पुरुष, गलमेवाडी (पाटण) येथील 24 वर्षीय महिला, धामणी येथील 31 वर्षीय पुरुष, गावडेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, दाह्यात (वाई) येथील 53 वर्षीय पुरुष आदी रुग्ण काही दिवसांपासून कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार घेत होते. उपचारनंतरचे त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज दिला.

या वेळी सहायक धर्मादाय आयुक्त एस. एल. फुले, निरीक्षक पी. आर. येवले, आर. एच. देवरे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते कोरोनामुक्त रुग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला. या वेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर आदींसह हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता. 


...अन्‌ तिच्याकडे दिले नवजात बालक 

कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये दाखल झालेल्या गलमेवाडी (ता. पाटण) येथील 24 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेची 24 मे रोजी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी प्रसूती झाली होती. संबंधित गर्भवती महिला बाधित असली, तरी तिच्या नवजात बाळाच्या स्वॅबचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला होता. कृष्णा हॉस्पिटलमधील यशस्वी उपचाराने कोरोनावर मात केलेल्या या बाळंतिणीला आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला, तसेच तिचे नवजात बालकही तिच्याकडे आज सुपूर्द केले.

फलटणच्या पाटकऱ्यास लाचप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
why Tapoḷa Ahir bridge is closed for traffic
Satara 17-year-old girl death case
Marathi News Esakal
www.esakal.com