
मल्हारपेठ (जि. सातारा) ः पाटण तालुक्याच्या डोंगराळ परिसरात भात लागणीच्या कामाला वेग आला असून, पाऊस सध्या तरी मध्यम स्वरूपाचच आहे. ओढ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीच्या कामास कमी प्रमाणात सुरुवात झालेली दिसत आहे. अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बळिराजा वाट पाहात असून, समाधानकारक पाऊस नसल्याने बहुतांश ठिकाणी लागणीची कामे खोळंबली आहेत.
पाटण तालुक्याचा पश्चिम भागात मागच्या आठ दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडला; परंतु भाताचे तरव्यांची वाढ समाधानकारक नसल्यामुळे लागणीची कामे खोळंबली. दरम्यानच्या काळात पेरणीपूर्वी रिमझिम पावसाने बहुतांशी क्षेत्रातील पेरणी झाल्यामुळे पिकांची उगवन क्षमता चांगली झाल्यामुळे यावर्षी चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. तालुक्याच्या पश्चिम कोयना, मोरगिरी, मनदुरे आणि चाफळ तारळे, ढेबेवाडी भागातील सर्वच ठिकाणी आडव्या पाण्यावरच येथील भातशेती अवलंबून असते. प्रामुख्याने या परिसरात इंद्रायणी, पुसा बासमती, मेनका, आर 24, रूपाली, आजरा धनसाळ, राशी पूनम, भोगावती आदी संकरित वाणांची लागन केली जाते. काही ठिकाणी पारंपरिक काळ खडवं, कोल्हापुरी, तांबट आणि इतर जातींच्या वाणाचीही लागण केली जात आहे. इंद्रायणी तांदळाला बाजारात जास्त मागणी असल्याने जवळपास 80 टक्के क्षेत्रात इंद्रायणी भाताची लागण होते.
भागात लागणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, अजूनही जमिनीत उफाळे फुटले नसल्यामुळे काही ठिकाणी लागणीची कामे खोळंबली असून, वगळींचे पाणीही आटूव लागले आहे. त्यामुळे भात लागणी झालीच नाही तर शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. मजुरांचा तुटवडा भासत असल्यामुळे पैरा पद्धतीला महत्त्व आले आहे.
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.