अखेर "या' 14 गावांत होणार जमिन खरेदी-विक्री

patan
patan

कऱ्हाड (जि. सातारा) ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील पाटण तालुक्‍यातील 14 गावांच्या खासगी क्षेत्रावरील खरेदी- विक्री व्यवहाराचे बंदी निर्बंध उठविण्यात आले आहेत. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सूचनेनुसार व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाठपुराव्यामुळे कार्यवाही झाली आहे. 

कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील पाटण तालुक्‍यातील 14 गावे शासन निर्णयानुसार कोअर झोनमधून वगळली होती. ती गावे वगळण्यात यावीत, या मागणीसाठी तालुक्‍याचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी प्रयत्न केले होते. जमिनीच्या सातबाऱ्यावर असणारे निर्बंधाचे शिक्के काढून टाकण्यात यावेत, यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती सत्यजितसिंह पाटणकर यांनी खासदार पाटील यांना केली होती. त्यानुसार खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पत्र लिहून त्या 14 गावांतील निर्बंधाचे शिक्के काढून टाकण्यात यावेत, अशी सूचना केली होती. 

शासन निर्णयानुसार कोयना अभयारण्याची पुनर्गठित अधिसूचना जारी करण्यात आल्याने अभयारण्यातील वगळलेल्या खासगी क्षेत्रास वन्यजीव (संरक्षण) अधिनियमनुसार हक्क हस्तांतरणाबाबत निर्बंध लागू होत नसल्याने पाटण तालुक्‍यातील नवजा, मिरगाव, कामरगाव, हुंबरळी, देशमुखवाडी, तोरणे, गोकुळ तर्फ हेळगाव, घाटमाथा, वाजेगाव, गोजेगाव- खुडुपलेवाडी, धुलईवाडी, गावडेवाडी, आरल, कुसवडे (वन कुसवडे) या गावातील खासगी क्षेत्रावरील खरेदी-विक्री व्यवहारातील बंदी निर्बंध उठवणे हरकत नाही, असा आदेश पाटणच्या तहसीलदारांना जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आला. या 14 गावांमध्ये बंदी निर्बंध असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करणे, जमीन तारण कर्ज काढणे, गहाणखत करणे आदी कामात अडथळे येत होते. मात्र, हे निर्बंध उठवल्याने संबंधित शेतकऱ्यांना हे व्यवहार करणे सोपे होणार आहे. 

निर्बंध उठवलेली गावे... 
नवजा, मिरगाव, कामरगाव, हुंबरळी, देशमुखवाडी, तोरणे, गोकुळ तर्फ हेळगाव, घाटमाथा, वाजेगाव, गोजेगाव-खुडुपलेवाडी, धुलईवाडी, गावडेवाडी, आरल, कुसवडे (वन कुसवडे) 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com