सातारा : फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. या वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या उष्णतेमुळे नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.