आगाशिवगडावर स्वखर्चातून हे कुटुंब करतय वृक्षारोपण

राजेंद्र ननावरे
Saturday, 22 August 2020

आगाशिव गडावर अजित सांडगे आणि कुटुंबीयांनी स्वखर्चातून आगाशिवाच्या पायथ्याला झाडे लावून ती जगवलीही आहेत. या उपक्रमाला आता युवकांकडूनही बळ मिळत आहे. 

मलकापूर (जि. सातारा) : आगाशिव गडावर वृक्ष संवर्धनासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करत असेल, तर ती बाब स्तुत्य आहे. अशी काही कुटुंब आहेत. त्यात आगाशिवनगरातील सांडगे कुटुंबाचाही त्यात उल्लेख होतो. अजित सांडगे आणि कुटुंबीयांनी स्वखर्चातून आगाशिवाच्या पायथ्याला झाडे लावून ती जगवलीही आहेत. 

वृक्षसंवर्धनाच्या आवडीने सांडगे कुटुंबीयांनी घरासमोर, परसबागेत, रानात अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. वृक्ष संवर्धनाचा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांनी आगाशिवगडही निवडला. गड मोठा आहे. मात्र, त्यांच्या परीने ते जेथे मोकळी जागा दिसेल, तेथे वृक्षारोपण करत आहेत. डोंगर कपारीत चालत जाऊन तेथे खड्डा काढून त्यामध्ये एक रोप ते लावत आहेत. आजअखेर 72 रोप त्यांनी लावली आहेत. ती जगवण्यासाठी ते झटत आहेत. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. उन्हाळ्यातही त्यांचा हा छंद ते परोपरीने जोपासताना दिसतात. कॅन ते झाडांना पाणी घालताना अनेकांना दिसतात. काहींनी आठ ते नऊ फुटांची झाडे तोडली. मात्र, त्यातून खचून न जाता त्यांनी पुन्हा ती झाडे उभी केली आहेत. 

सर्वत्र नाहक खर्च केला जातो, वाढदिवसालाही जल्लोष असतो, मात्र सांडगे कुटुंबीयांनी युवकांना वृक्षारोपण करून वाढदिवस साजरी करण्याची पायवाट आखली आहे. त्याशिवाय अन्य लोकांनाही त्यासाठी हाक दिली. त्याला युवकांनी प्रतिसाद दिला. दिवसेंदिवस या कार्यामध्ये युवकांचा सहभाग वाढत आहे. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी झाडांना खते घातली आहेत. काही झाडेसुद्धा दिली आहेत. वृक्ष लागवडीबरोबर पक्षांनाही खाण्यासाठी धान्य दिले जाते. सांडगे कुटुंबीय रोपे खरेदी करून आगाशिवावर आझाद कॉलनीच्या वरच्या भागात पठारावर वृक्ष लावत आहेत. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

आता कडुनिंब पळविणार कोरोनाला? कसे ते वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The family is planting trees at Agashivgad at their own expense