Maharashtra Farmer Schemes
esakal
सातारा : जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत दिवाळी अग्रीम म्हणून प्रतिशेतकरी पाच हजार रुपये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले (₹5000 DBT payment for farmers in Satara) आहेत. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले होते, अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.