सातारा : एक लाखांवर मुलांना पहिला डोस

जिल्ह्यात १०० केंद्रांत लसीकरण मोहीम; जावळीतील ८३ टक्के मुले लसवंत
सातारा : एक लाखांवर मुलांना पहिला डोस
सातारा : एक लाखांवर मुलांना पहिला डोसSakal
Updated on

सातारा: जिल्ह्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची कोरोना प्रतिबंधक लस मोहीम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात १०० हून अधिक केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत लशीचा पहिला डोस एक लाख आठ हजार मुलांना देण्यात आला आहे. त्यामुळे या वयोगटात पहिल्या डोसचे ७० टक्के लसीकरण झाले असून, लसीकरणास मोहिमेस जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आतापर्यंत या लसीकरणात जावळी तालुक्यात सर्वाधिक ८३ टक्के लसीकरण झाले आहे.

गेल्या काही दिवसांत देशभरात कोरोनाचे संकट कमी होत आहे. परंतु, मागील चार महिन्यांपूर्वी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन डिसेंबर २०२१ महिन्यात केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण करण्याची घोषणा केली. या निर्णयाची अंमलबजावणी तीन जानेवारीपासून सुरू करून लसीकरणास प्रत्यक्षात सुरुवात केली. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, १५ ते १८ वयोगटातील प्रत्येकाने लस घेण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत शहरनिहाय लसीकरण मोहीम राबवून जास्तीत-जास्त मुलांचे लसीकरण करण्याचे आव्‍हान आरोग्य विभागासमोर आहे. याचबरोबर जिल्ह्यातील १८ वर्षांपुढील बहुतांश नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला असून, दुसरा डोस शिल्लक असणारे नागरिक कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे लशींचे डोसही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने सद्यःस्थितीत लसीकरण सत्रे सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांचा दुसरा डोस ६४ हजार ९०० मुलांचा पूर्ण झाला असून, ४१ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात लशींचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

४१ हजार नागरिकांना

बूस्टर डोस

जिल्ह्यात बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत ४१ हजार २०० नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. पहिला डोस घेऊन ९ महिने अथवा ३९ आठवडे पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस घेण्यास परवानगी देण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com