पाटणात 325 गावांत 118 कोटींची हानी

अतिवृष्टीसहित भूस्‍खलनाने झालेल्या नुकसानीचे १९२ कर्मचाऱ्यांनी केले पंचनामे
Heavy Rain
Heavy Rainesakal

पाटण (सातारा) : तालुक्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टी (Heavy Rain) व भूस्‍खलनामुळे (Patan Taluka Landslide) मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ३० जणांना जीव गमावावा लागला आहे. तालुक्यात ११८ कोटी ७३ लाख तीन हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. महसूल खात्याच्या १९२ कर्मचाऱ्यांनी झटून पंचनाम्याचे शिवधनुष्य पेलले आहे. पंचनामे पूर्ण करण्यासाठी महसूलच्या ५९, कृषी ३१ व पंचायत समितीच्या (Panchayat Committee) १०२ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

Summary

तालुक्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टी व भूस्‍खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ३० जणांना जीव गमावावा लागला आहे.

पहाटे गाढ झोपेत असलेल्या लोकांवर २३ जुलै रोजी भूस्‍खलनाने घाला घातला. त्यात माणसे गाडली गेली. सलग चार दिवस पाऊस कोसळला. पश्चिम भागातील डोंगर खचल्याने तालुक्याची मोठी हानी झाली. शासनाने तातडीने मदतकार्य राबवित जीवन पूर्वपदावर आणताना तालुका प्रशासनाने पंचनामे केले. त्यात तालुक्यात ११८ कोटी ७३ लाख तीन हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. शेतजमीन, खरीप पिके, शेती पाणीपुरवठा योजना व जनावरांचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातील पाटणचे ४१ तलाठी, सहा मंडलाधिकारी व कऱ्हाड तालुक्यातील दहा तलाठी आणि दोन मंडलाधिकारी अशा ५९ कर्मचाऱ्यांनी तर पंचायत समितीचे १०२ ग्रामसेवक, राज्य शासनाच्या कृषी विभागाचे पाटणचे २४ व इतर तालुक्यातील सात अशा १९२ कर्मचाऱ्यांची ३२५ गावांतील पंचनामे करताना पुरती दमछाक झाली.

Heavy Rain
..तर 15 ऑगस्टला आत्मदहन करणार; दशरथ फुलेंचा सरकारला इशारा

रस्त्यांवर भराव आल्याने, पूल वाहून गेल्याने व काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने दळण-वळण यंत्रणा कोलमडून पडली होती. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पंचनामे करण्याचे कर्तव्य रात्रीचा दिवस करून पार पाडले. ३२५ गावे व त्याखालील वाड्या-वस्त्यांवर पोचताना दुर्गम भागात दहा ते १५ किलोमीटर पायपीटही केली. झालेल्या आपत्तीतून तालुका सावरत आहे. नेतेमंडळी गावभेटीदेऊन दिलासा देत आहेत. मात्र, आता शेतजमीन व पिकांसह जनावरांची नुकसान भरपाई आणि धोकादायक गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडून निधी मिळावा, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.

Heavy Rain
काळ्या यादीची भीती दाखवून ठेकेदारांशी 'सेटलमेंट'

...असे झाले नुकसान

  • अतिवृष्टी व भूस्‍खलनामुळे शेतजमीन -चार कोटी ९४ लाख ६२ हजार ५००

  • खरिपातील पिके - तीन कोटी ४९ लाख ६५ हजार

  • जनावरांचे - २० लाख तीन हजार

  • उद्‌ध्वस्त घरे - एक कोटी ४८ लाख तीन हजार

  • ग्रामीण रस्ते - ६६ कोटी सात लाख

  • सार्वजनिक बांधकाम विभाग - ३५ कोटी ४४ लाख

  • नळ पाणीपुरवठा योजना - तीन कोटी दहा लाख

  • शेतीपंपांचे - ९९ लाख

  • वीज वितरण कंपनीच्या पोल व वाहिन्या - तीन कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com